नाशिक: ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत आणि मालेगाव शहरात केलेल्या कारवाईत अवैध व्यवसाय तसेच दहशत पसरविण्याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आठ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थाची अवैध वाहतूक प्रकरणी प्रथमेश राऊत (२५, रा. घुलेवाडी) आणि शिवाजी सातपुते (२७, रा. साईनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार किलो २० ग्राम गांजा जप्त केला. मुद्देमाल आठ लाख, ३० हजार ४०० रुपयांचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या घटनेत मालेगाव शहरातील तीन कंदिल परिसरात काही संशयित अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगत गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या माहितीच्या आधारे अन्सारी अहमद (२३, रा. नयापुरा गल्ली), अन्सारी अंजुम (२०, रा. मोती तालाब) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. त्यांच्याविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.