धुळे: कोणताही मसाला घेतांना त्याचा लालभडक रंग, वास याकडे गृहिणी अधिक लक्ष देतात. परंतु, वरवर अशाप्रकारे दिसणारे मसाले आरोग्यासाठी खरोखरच योग्य आहेत काय, याचा विचारही कोणी करीत नाही. गृहिणींची ही मानसिकता ओळखून अनेक जण मसाल्यांत भेसळ करीत असतात. असाच एक भेसळीचा प्रकार धुळे औद्योगिक वसाहतीत उघडकीस आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा घालून खाद्य मसाल्यांमध्ये हानिकारक रंग आणि रसायन भेसळ करणारी साखळी उघडकीस आणली. टॉवर ब्रँड नावाने हे मसाले विक्रीसाठी बाजारात आणण्यात आले होते. इम्रान अहमद आणि मोहंमद असीम (दोन्ही रा.मुस्लिम नगर, धुळे) अशी संशयितांची नावे आहेत. धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीत मूळ उद्योग थाटण्यात आला होता. धुळ्याजवळील मोहाडी येथे लाल मसाला आढळल्याने मसाला भेसळयुक्त असल्याची खात्री करण्यात आली. यानंतर अन्न व औषध प्रशासनाला बरोबर घेवून पोलिसांनी कारवाई केली.

हे ही वाचा…Amit Shah Convoy: रस्त्यात साचलेलं पाणी पाहून अमित शाहांच्या ताफ्यानं वाट बदलली; काँग्रेसच्या प्रवक्त्यानं म्हटलं, “गडकरी, शिंदेंचा विकास पाहून…”

मसाल्यात हानिकारक रंग आणि रसायन वापरून तो उच्च दर्जाचा असल्याचा दावा केला जात असे. हे रसायन मस्जिद बंदर येथून आणले जात असे. मुख्तार अन्सारी याने टॉवर ब्रँड या नावाने मसाले उपलब्ध करून दिले होते. औद्योगिक वसाहतीमध्ये एका गाळ्यात हे काम केले जात होते. या लाल मसाल्यात भेसळ असल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले. संबंधित ठिकाणी आठ किलो भेसळयुक्त तेल, ४० किलो अत्यंत हानिकारक टॉक्सिक रंग आणि अन्य रसायने आढळले. टॉवर ब्रॅंडच्या मसाल्याची बाजारात ७५० आणि ४०० रुपये किलो अशी दोन दरात विक्री होते.

हे ही वाचा…महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ठिकाणी केलेल्या कारवाईत प्रचलित कायद्याच्या तरतुदीप्रमाणे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मसाल्याचे नमुने जमा करण्यात आले. ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असून अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.