ब्राह्मण महासंघाची निदर्शने

‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटावर बंदी आणावी, या मागणीसाठी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने शुक्रवारी चित्रपटगृहाबाहेर निदर्शने करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात शहरात चित्रपट प्रदर्शित झाला. याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे ब्राह्मण महासंघाने सांगितले.

संदीप पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या कल्पना कोठारी आहेत. चित्रपटात ब्राह्मण समाजाचा स्पष्ट उल्लेख असून जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संवादाची पेरणी करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटातील बरीचशी दृश्ये, संवाद ब्राह्मण समाज, पुरोहितांची निंदा-नालस्ती करणारे आहेत. समाजात वैरभाव निर्माण करणारे असून खालच्या थराला जात ब्राह्मण समाजावर टीका करण्यात आल्याची तक्रार ब्राह्मण महासंघाने केली आहे. इतर समाजांतही श्रद्धेने केल्या जाणाऱ्या श्राद्धावर टीका करीत अपशब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे ब्राह्मण वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटातील चुकीच्या दृश्यांमुळे, संवादामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ

शकतो. यामुळे या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी महासंघाने काही चित्रपटगृहांबाहेर निदर्शने केली. संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक, इतर संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, काही चित्रपटगृहांबाहेर ब्राह्मण महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यात या वेळी पुरोहित संघाचे शेखर शुक्ल, उपेंद्र देव, अतुल गायधनी आदी सहभागी झाले. विरोध असतानाही वेगवेगळ्या सिनेगृहांत बंदोबस्तात चित्रपटाचे प्रयोग झाले.