लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरीत तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई जाणवत आहे. महिलांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी एल्गार सामाजिक संघटनेच्या वतीने पुरूषांच्या वतीने १९ मे रोजी इगतपुरी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील अनेक आदिवासी गाव, पाड्यांवर भीषण टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना जंगल परिसरात, डोंगराच्या पायथ्याशी पाणी भरण्यासाठी जावे लागते. त्या ठिकाणी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे. तालुक्यातील अनेक कातकरी वस्तीवर जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना पोहचविण्याची गरज आहे. त्या वस्तीचा या योजनेत समावेश नाही. त्यामुळे ते सर्व पाडे त्याच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत.

आणखी वाचा-नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत दाम्पत्याचा २१ वर्षीय युवतीला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इगतपुरी तालुक्यात १६ धरणे असताना त्या धरणातील पाणी मुंबई, नगर, ठाणे, पालघर, नाशिक महानगरपालिका या ठिकाणी जात आहे. या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी बांधव त्याच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच प्रशासनाला जाब विचारण्यासाठी १९ मे रोजी एल्गार सामाजिक संघटनेच्या वतीने पुरुषांचा हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.