आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट्स तथा तृणधान्य महोत्सवास अखेर जिल्हा परिषदेकडून मुहूर्त लागला असून महोत्सवाच्या आयोजनाची तारीख निश्चित झाली आहे. २८ एप्रिल ते एक मे या कालावधीत हा महोत्सव डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवावर निधीच्या अभावाचे सावट होते.

केंद्र सरकारच्या पुढाकारामुळे यंदाचे वर्ष हे ‘मिलेट्स वर्ष’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर घोषित झाले आहे. नाशिक जिल्ह्यातही भरडधान्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यापेक्षाही भरडधान्यावर प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. जनतेच्या आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या भरडधान्याच्या उलाढालीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

हेही वाचा >>> धरणगावात ठाकरे गटातर्फे अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच मिलेट्स महोत्सवाच्या आयोजनाचा संकल्प जिल्हा परिषदेने सोडला होता. मात्र, निधीची अनुपलब्धता तसेच इतर कारणांमुळे हा महोत्सव पुढे ढकलण्याची नामुष्की आयोजकांवर आली होती. निधीची उपलब्धता होताच महोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. महोत्सवात सुमारे २५० दालने राहणार आहेत. यापैकी २० दालने हे केवळ भरडधान्यासाठी आरक्षित असतील. वेगवेगळ्या प्रकारातील भरडधान्यांचे प्रकार या दालनांमध्ये पाहण्यास मिळणार आहेत. महोत्सवाच्या जागृतीसाठी पोर्टल तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच परवानगी दिली आहे. जनतेने आहारात भरडधान्यांचा (मिलेट्स) समावेश करावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. मान्यवरांच्या सहभागासह मिलेट्स पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यासह विद्यार्थ्यांच्या आहारातही भरडधान्याचा समावेश करण्यासाठी आगामी काळात तरतूद केली जाणार आहे. या अगोदर महोत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हा परिषदेने आदिवासी विभागासह ग्रामीण विकास विभाग आणि इतर विभागांशीही पत्रव्यवहार केला होता. परंतु, अपेक्षित प्रतिसाद न आल्याने गरजेइतक्या ‘सरल’च्या निधीस ‘सेस’ची जोड देऊन बाहेरील घटकांचाही उपक्रमाच्या प्रोत्साहनासाठी योगदान घेण्याचा प्रयत्न केला होता.