मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नाशिक द्रुतगती परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला आहे. ६५.४१ किमी लांबीचा हा मार्ग असणार असून यासाठी २६०४.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर या परिक्रमा मार्गासाठी ४००.९३ हेक्टर जागेची आवश्यकता आहे.

हेही वाचा >>> ठाणे वाहतूक कोंडीमुक्तीसाठी साडेसहा हजार कोटींचे तीन प्रकल्प; निविदा प्रसिद्ध; ‘एमएमआरडीए’कडून सल्लागार नियुक्ती

या मार्गाच्या आखणीचे काम सुरू असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुंभमेळ्याच्या आधी, २०२७ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे यासंबंधीचा प्रस्ताव तयार करत त्यास शक्य तितक्या लवकर मान्यता घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न असणार आहे. औद्याोगिक शहर, पर्यटनस्थळ आणि तीर्थक्षेत्र अशी नाशिकची ओळख आहे. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा >>> मुंबई: सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये १५ मार्चपासून सुरू होणार यकृत बाह्यरुग्ण विभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक शहरातील अवजड वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अपुरे पडत असून वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यातच २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होऊ घातला आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबत अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाअंती नाशिक शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेर वळविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. यातूनच नाशिक परिक्रमा मार्गाचा पर्याय पुढे आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रस्तावित सुरत – चेन्नई द्रुतगती महामार्ग नाशिक शहराजवळून जाणार आहे. या द्रुतगती महामार्गाला परिक्रमा मार्ग जोडला जाणार आहे. परिक्रमा मार्ग प्रकल्पाची व्यवहार्यता आणि सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीने मेसर्स मोनार्च सर्व्हेअर्स अँड इंजिनीयरिंग कन्सल्टन्ट कंपनीला दिली आहे.