नाशिक : पंचवटीत रविवारी सकाळी म्हसरूळ शिवारातील चामरलेणी पायथ्याशी एक मृतदेह आढळला. या व्यक्तीच्या अंगावर जखमा आढळल्या असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी चामरलेणी पायथ्याशी युवकाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंकुश चिंतामण, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मृत यवकाच्या डोक्याला आणि शरिरावर ठिकठिकाणी जखमा आढळल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. श्वान पथकाला पावसामुळे माग काढण्यात अडचणी आल्या. युवकाच्या मृतदेहापासुन काही अंतरावर ब्लँकेट आणि विजार सापडली. शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.