Maharashtra mlc election result 2023 : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली होती आणि अखेर पाचव्या फेरीनंतर त्यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत आणि नंतरही राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया दिली, यावेळी त्यांना भावना अनावर झाल्याचेही दिसून आले.

शुभांगी पाटील म्हणाल्या, “झाशीची राणी जशी लढली, मी झाशीच्या राणीच्या पायाची धूळही नाही. पण झाशीची राणी लढली तसं मला लढायचं होतं. एक मोठी धनसंपत्ती, अगदी अब्जोमध्ये आणि मी तर झोपडी होती तो तर फार मोठा बंगला होता. पण झोपडीनेही तिचे पाय पक्के रोवून ठेवले होते. हे दाखवून द्यायचं होतं. ४० हजार मतं मला मिळाली. पण यामध्ये जुनी पेंशनचा पराजय झाला. यात विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला. यामध्ये लढणाऱ्या हजारो शिक्षकांचा पराजय झालेला आहे.”

हेही वाचा – “…पण विजयोत्सव साजरा करणार नाही” सत्यजित तांबेंनी केलं जाहीर!

याचबरोबर, “उद्यापासून ज्यांनी १५ वर्षे तीन टर्म काय केलं? हे तुम्हाला माहीत आहे. पण आता वारसा काय करणार आहे, याकडे तुमच्या सगळ्यांचे आणि माझेही डोळे लागले आहेत.” असंही यावेळी शुभांगी पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा – MLC Election Result : “आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सुचवलं होतं, की…” नागपूरमधील पराभवानंतर फडणवीसांचं मोठं विधान!

सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने महिला नेत्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची बनली होती. ३० जानेवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकीचा अखेर निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत ६८ हजार ९९९ मतं मिळवत सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Latest Breaking News Today : अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी; भाजपाचा पराभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर ६८ हजार ९९९ मते मिळाली. तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं. चुरशीच्या या लढतीत सत्यजित तांबे यांनी सुमारे २९ हजार ४६५ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे.