Maharashtra mlc election result 2023 : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या ना.गो.गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत या जागेसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे.

MLC Election Result : कोकणातील विजय ते नागपूरमधील पराभव; सर्व जागांच्या निकालावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
friendly fight nashik
नाशिकमध्येही मैत्रीपूर्ण लढत करावी – काँग्रेसची मागणी

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “नागपूरची जागा आम्ही जिंकू शकलो नाही, आपल्याला कल्पना असेल की नागपूरची जागा शिक्षक परिषदेने लढली. मूळात कोकण आणि नागपूर दोन्ही जागा शिक्षक परिषद लढायची. या दोन्ही जागा भाजपाला लढू द्याव्यात, अशाप्रकारचा आमचा आग्रह होता पण, कोकणात त्यांनी तो आग्रह मान्य केला पण नागपूरची जागा आम्हाला लढू द्या, असा त्यांनी आग्रह केला. आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सुचवलं होतं, की शिक्षक परिषद कदाचित निवडून येऊ शकणार नाही, भाजपा लढली तर निवडून येऊ शकेल. पण त्यांचा आग्रह असल्याने त्यांनी जागा लढवली आम्ही समर्थन दिलं. पण त्या ठिकाणी ती जागा निवडून येऊ शकली नाही. याचं निश्चित आम्हाला दु:ख आहे.”

Nagpur MLC Election 2023 : “नागपूरमध्ये भाजपाचा उमदेवार असता तर आम्ही जिंकलो असतो” चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान!

प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “ती जागा गेली याला काही भाजपाचं अपयश नाही म्हणता येणार. भाजपाचा एबी फॉर्म नाही, भाजपाचा उमेदवार नाही. जर भाजपा उमेदवार असता तर अजून काही वेगळं चित्र असतं. त्यामुळे मला वाटतं, यावर हुरळून जाण्याची काही गरज नाही.”

गाणार यांना भाजपाने पाठिंबा दिला होता –

गाणार यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. संपूर्ण भाजपची यंत्रणा गाणारांच्या प्रचाराला लागलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मतदानाच्या दिवशीही ठिकठिकाणी गाणारांसाठी भाजपने बुथ लावले होते. प्रचारातही भाजप नेते गाणार हे भाजपचेच उमेदवार असल्याचे सांगत होते.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे.