नाशिक – शहरातील पाथर्डी आणि पिंपळगाव खांब परिसरातील पशुधनावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथर्डी- नांदूर मार्गावर असलेल्या पोरजे यांच्या मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.

काही महिन्यांपासून पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात मळ्यांमध्ये राहणारे शेतकरी बिबट्यामुळे भयभीत झाले होते. अधूनमधून बिबट्या दिसायचा. काही वेळा त्याने शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्लेही केले होते. शेतकऱ्यांनी वनविभागाकडे मदत मागितल्यानंतर वनविभागाने बिबट्याच्या ठशाचे नमुने घेत सुखदेव पोरजे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

हेही वाचा – काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

बिबट्या अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आठ ते नऊ वर्षांचा हा नर बिबट्या आहे. नाशिक पश्चिम वनविभागाचे वनसंरक्षक अधिकारी पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग परिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे यांनी बिबट्याला जाळ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न केले.