नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी शहर पोलीस सरसावले असून एकाच दिवशी दोन बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित तीन जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी रिपाइंचा ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील बागूल यांचा पुतण्या गौरव बागूल यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सातपूर येथील हॉटेल ऑरो येथे रविवारी झालेल्या गोळीबारात एक ग्राहक जखमी झाला. या प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नाशिकचा पदाधिकारी तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या टोळीचा सहभाग उघडकीस झाला. सातपूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक लोंढे यासह तीन जणांना सहआरोपी करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून भूषण लोंढे फरार आहे. लोंढे टोळी संबंधित हाॅटेल चालकाकडून खंडणी वसूल करीत होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लोंढे पिता-पुत्रासह टोळीतील तीन जणांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गोळीबार प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नाशिकचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या टोळीचा सहभाग उघडकीस झाला. सातपूर पोलीसांनी या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवत तातडीने तीन जणांना ताब्यात घेतले. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी प्रकाश लोंढे यांच्यासह तीन जणांना सह आरोपी करण्यात आले असून या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

लोंढे टोळी संबंधित हाॅटेल चालकाकडून खंडणी वसूल करीत होती. सूत्रधार भूषण लोंढेसह इतर संशयित फरार आहेत. सातपूर येथील माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण याच्याविरुध्द याआधीही हाणामारी, खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस उपायुक्त काळे यांनी, लोंढे टोळीने पूर्वनियोजित कट केल्याचे सांगितले. या टोळीचा प्रमुख प्रकाश लोंढे, मुलगा दीपक उर्फ नाना लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे या चार जणांना सहआरोपी करण्यात आले आहे.

लोंढे बोलले, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला

शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि या गुन्हेगारीला मिळणारा राजकिय वरदहस्त याविरोधात पोलिसांनी आता पूर्णपणे बळाचा वापर करण्यास सुरूवात केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिकचे पदाधिकारी प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक लोंढे व अन्य संशयितांना न्यायालयात नेतांना त्यांच्याकडून पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे जोरजोरात वदवून घेतले. या कारवाईचे नाशिककरांनी स्वागत केले आहे.