नाशिक : मागील आठवड्यात टपाल विभागाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराची दोन प्रकरणे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाली. टपाल विभागाविषयी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत असून अपहार किंवा अन्य आर्थिक विषयक तक्रार असल्यास नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन टपाल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सिडको टपाल विभागातील सहायक पदावर कार्यरत असलेल्या संशयित सचिन बोरकर याने पत्नीच्या नावे खाते उघडून टपाल विभागाची नऊ लाखांहून अधिक रकमेला फसवणूक केल्याचे प्रकरण ताजे असताना सोमवारी पिंपळगाव बहुला टपाल कार्यालयात २९ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे प्रकरण पुढे आले. याविषयी डाकपालविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश तिवडे (रा. पिंपळगाव बहुला) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित डाकपालाचे नाव आहे. तिवडे २०१९ पासून पिंपळगाव बहुला येथील डाकघरचा कार्यभार सांभाळत असून पदाचा दुरूपयोग करुन त्याने ऑगस्ट २०२३ पर्यंत २९ लाख १० हजार २०० रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा…नाशिक : अंबड प्रकल्पग्रस्तांचे पायी मुंबईकडे कूच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी दक्षिण उपविभागाचे अधिकारी मनिष देवरे यांनी माहिती दिली. ज्यावेळी कर्मचाऱ्यावर संशय आला, त्याच दिवशी त्याचे निलंबन करण्यात आले होते. खातेदारांनी घाबरून जाऊ नये. तक्रार असेल, पैसे दिल्याच्या पावत्या, पुस्तक आदी पुरावा असेल तर त्यांना निश्चित पैसे मिळतील. नागरिकांच्या जशा तक्रारी येत आहेत, त्याप्रमाणे पुराव्यानुसार त्यांना परतावा होत आहे. टपाल विभाग तसेच नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात येत असून त्यांना कामावर घ्यायचे की नाही, याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे देवरे यांनी सांगितले.