मनमाड : दिल्लीसह उत्तर भारतात धुक्याचा प्रभाव कमालीचा वाढल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर भारतातून मनमाडमार्गे पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या विविध प्रवासी गाड्या तब्बल एक ते ३० तासांच्या विलंबाने धावत होत्या. या दिवशी गाड्या विलंब होण्याच्या प्रकाराने आजवरचा विक्रम मोडला. गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर -नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही गाडी तब्बल ३० तासांच्या विलंबाने धावत होती.

जम्मू-काश्मीरमध्ये तापमानाचा उच्चांक झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतात थंडीचा कहर वाढलाच पण, धुक्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असल्याने १५ दिवसांपासून रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. दृष्यमानता कमालीची घसरल्याने सोमवारी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या विविध प्रवासी गाड्या मोठ्या विलंबाने धावत होत्या.

हेही वाचा : नाशिक : इंदिरानगरात गॅस गळतीमुळे आगीत दोन जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात प्रामुख्याने तिरुपती-शिर्डी एक्स्प्रेस तीन तास ४० मिनिटे, नवी दिल्ली-वास्को गोवा एक्स्प्रेस सहा तास ३० मिनिटे, जम्मू तावी-पुणे झेलम एक्स्प्रेस सहा तास ४० मिनिटे, अमृतसर -नांदेड सचखंड एक्स्प्रेस ३० तास, अयोध्या-कुर्ला एक्स्प्रेस पाच तास, गोरखपूर-कुर्ला एक्स्प्रेस चार तास, अमृतसर-मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस १५ तास, फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल आठ तास तर बनारस-मुंबई वाराणसी एक्स्प्रेस तीन तासांच्या विलंबाने धावत होती.