धुळे – शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न चांगलाच गाजत असून काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ठाकरे गटातर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

शहराच्या चहुबाजूला पाणीच पाणी असतांना १० ते १२ दिवसाआड पाणी पुरवठा का करण्यात येतो, असा ठाकरे गटाचा प्रश्न आहे. भर उन्हाळ्यात दुषित पाणी पुरवठा होत असल्याने धुळेकर वैतागले आहेत. वर्षभराची पाणीपट्टी आकारून केवळ ४८ दिवस पाणी पुरविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरात १५ दिवसांपासून विविध भागात पिवळसर, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी वितरित होत आहे. यामुळे आजार फोफावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर ठाकरे गटाच्या वतीने महानगर पालिकेच्या मुख्य दरवाजासमोर विविध भागातील दुषित पाणी बाटल्यांमध्ये जमा करून त्या ठेवण्यात आल्या.

हेही वाचा >>>बीजेपी क्या हुआ तेरा वादा, पाणीप्रश्नी धुळेकरांचा फलकाव्दारे प्रश्न 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येवून “धुळेकरांनो भाजपा हटवा, स्वतःला वाचवा” अशा आशयाचा फलक झळकविण्यात आला. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन दुषित पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्यांना भेट दिल्या. याप्रसंगी माजी आमदार प्रा. शरद पाटील, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे,उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील आदी उपस्थित होते.