लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: सिन्नर ते शिर्डी महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
सिन्नर -शिर्डी महामार्गावर नाशिक आगाराची शिवशाही बस शिर्डीकडून सिन्नरकडे जात असताना वावी, पांगरी येथील शिंदे वस्तीजवळ बसमध्ये बिघाड झाल्याने बुधवारी दुपारी एक वाजेपासून उभी होती. रात्री बस दुरुस्त करण्यासाठी आलेल्या सिन्नर आगाराच्या पथकास बसमध्ये चालकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. राजू ठुबे (रा.दोनवाडे, विंचुरदळवी) असे चालकाचे नाव आहे. त्यानंतर पथकाने राष्ट्रीय महामार्ग गस्ती पथकाचे प्रमुख श्रेयस हुबळीकर,पर्यवेक्षक प्रशांत शिंदे, रुग्णवाहिका चालक दुर्गेश शिंदे यांच्या मदतीने पोलिसांना पाचारण केले.