छत्तीसगढ राज्यातील नारायणपूर, जगदालपूर या गावातील चर्चवर हल्ला करणार्‍या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी धुळ्यात मूक मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष जोसेफ मलबारी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातील पुरोगामी संघटना सहभागी झाल्या होत्या. २०१४ नंतर देशात ख्रिश्चन धर्मियांवरील हल्ले वाढले असून, धर्मप्रचारक लोकांना मारहाण करणे, धर्मगुरूंना धमकावणे, प्रार्थना स्थळांवर हल्ले करण्याचे कारस्थान देशात वाढले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

हेही वाचा – पिंपळनेरला चार चोरटे ताब्यात; दोन अल्पवयीनांचा समावेश

हेही वाचा – धुळे : दोन चोरांकडून पाच मोटारसायकली जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ख्रिश्चन बांधवांसाठी प्रत्येक राज्यात मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणीही मूकमोर्चावेळी करण्यात आली. शहरातील कॅथोलिक चर्चपासून निघालेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. मोर्चात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले, शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.