नाशिक: शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांना शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने दणका दिला असून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. नाशिककरांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून अशी कारवाई नियमितपणे करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकास शहरातील गुन्हेगारी टोळ्या, नोंदीतील गुन्हेगार यांचे समूळ उच्चाटन करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. परंतु, त्यासह शाळा आणि महाविद्यालयांबाहेर, परिसरात विनाकारण फिरणारे, महाविद्यालयांमधील मुलांना वाईट मार्गाला लावणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले. त्यानुसार ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने शनिवारी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुंडाविरोधी पथकास सूचना केल्या. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकाने नाशिक शहरातील महाविद्यालय परिसरात गस्त करून टवाळखोरांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाण्यात कारवाई केली.

हेही वाचा… मालेगावात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न; दोन संशयित ताब्यात

गुंडाविरोधी पथक महाविद्यालय परिसरात दाखल होताच विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी महाविद्यालय परिसरातून धूम ठोकली. सदरच्या कारवाईबद्दल महाविद्यालय प्रशासनाने पोलीस आयुक्तांसहर गुंडा पथकाचे कौतुक करून अश्याच प्रकारे शाळा, महाविद्यालय परिसरत गस्त घालावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा… द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, मिलिंद जगताप, गणेश भागवत यांनी केली