नाशिक: शहर परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात नाशिककरांचेही सहकार्य अपेक्षित असल्याने शहर पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतवाहिनी क्रमांकावर अवघ्या ३६ तासात दोनशेपेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

नाशिक शहर पोलिसांतर्फे नागरिकांना आपला अभिप्राय, सूचना नोंदवता याव्यात, यासाठी पोलीस आयुक्तांनी ९९२३३२३३११ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांनी आपल्या जवळील माहिती, सूचना, अभिप्राय या क्रमांकावर देणे आवश्यक आहे. तक्रारी, आपत्कालीन परिस्थितीसाठी ११२ क्रमांकाशी संपर्क साधावा, हा क्रमांक आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली नंबर आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. या आवाहनाला नाशिककरांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून ३६ तासात २३६ संदेश प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा… शहर पोलिसांतर्फे मदतवाहिनी जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक पोलिसांना शुभेच्छा देणारे १४३, वाहतूक समस्या मांडणारे ३५, पोलीस ठाणेनिहाय ३०, इतर १५, अमली पदार्थ वा तत्सम पाच, ध्वनी प्रदुषणाचे दोन, महिला सुरक्षेचे तीन, गस्तसंदर्भात दोन, रस्त्यावरील टवाळखोरीविरोधात एक, याप्रमाणे तक्रारी, सूचना प्राप्त झाल्या आहेत.