नाशिक – दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील जनता विद्यालयजवळून एका शाळकरी मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलाच्या प्रसंगावधानाने डाव फसला. तीन संशयितांना उमराळेकरांनी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमराळे येथील जनता विद्यालयात उमराळेसह जवळच्या इतर गावांमधील विद्यार्थीही शिक्षण घेण्यासाठी येत असतात. कृष्णा बोडके (१३) हा विद्यार्थीही या शाळेत शिक्षण घेतो.

हेही वाचा >>> शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळा सुटल्यानंतर पायी घरी निघाला असताना शाळेच्या प्रवेशद्वारावर विक्रम घाडगे याच्या सांगण्यावरून मयूर सोनवणे आणि राम दरेकर यांनी कृष्णा यास गाठले. तालमीत असताना विक्रमकडून उसनवारीने घेतलेले पैसे परत दे, अशी मागणी दोघांनी कृष्णाकडे केली. कृष्णाने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यावर मयूर आणि राम यांना राग आला. त्यांनी कृष्णा यास दमदाटी करून, मोटर सायकलवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कृष्णाच्या प्रसंगावधानाने आणि उमराळेकरांच्या सहकार्याने संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.