जळगाव – जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यांसह अन्य मागण्यांची शासन-प्रशासन दखल घेत नसल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांनी येथे पुन्हा सुरू केलेल्या आंदोलनाच्या १४ व्या दिवशी बुधवारी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या प्रतिमा तसेच मंत्रिमहोदयांनी आकाशावरून जमिनीवर यावे, जास्त हवेत उडू नये, असा उल्लेख असलेले काळे फुगे आकाशात सोडून निषेध केला.

शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आदिवासी कोळी आंदोलन समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन चालू आहे. पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी हे उपोषणास बसले आहेत. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास समितीतर्फे प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात संतप्त समाजबांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील यांच्या प्रतिमा व त्यांनी आकाशावरून जमिनीवर यावे व जास्त हवेत उडू नये, असा उल्लेख असलेले काळे फुगे आकाशात सोडले. राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात बबलू सपकाळे, विशाल सपकाळे, दीपक तायडे, प्रल्हाद सोनवणे आदी सहभागी होते.

Navneet rana amaravati
“यावेळी मोदींना घरी…”, नवनीत राणांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ; म्हणाले, “तुम्हाला मत देऊन…”
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Raju Shetty
शेतकरी, कामगारांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी विजयी करा – राजू शेट्टी यांचे आवाहन

हेही वाचा…जळगाव जिल्ह्यातील तीन कापूस उत्पादकांना १० लाखांचा गंडा, मालमोटारीस बनावट क्रमांक पाटी लावत फसवणूक

प्रा. सोनवणे यांनी, आदिवासी टोकरे कोळी समाजाला जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र सुलभरित्या न दिल्यास याची किंमत शासनाला मोजावी लागेल, असा इशारा दिला. जिल्ह्यातील एकही मंत्री आंदोलनस्थळी आलेला नाही. मंत्र्यांनी जनतेकडे यायला हवे आणि अडचणी सोडवल्या पाहिजेत, अशी मागणी करुन प्रा. सोनवणे यांनी, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावरीह टीका केली.