नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील बिल्वतीर्थ तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील चौकीमाथा परिसरातील तनुजा कोरडे (१३) आणि अर्चना धनगर (१३) या दोन्ही शनिवारी सकाळी बिल्वतीर्थावर धुणे धुण्यासासाठी गेल्या होत्या. कपडे धूत असतांना पाय घसरल्याने अर्चना पाण्यात पडली.

अर्चना बुडू लागताच तनुजा तिला वाचवण्यासाठी पुढे सरसावली. या प्रयत्नात तीही बुडाली. हा प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताच मुलींना तातडीने बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा…नामसाधर्म्य असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मारहाण; नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला वादाचे ग्रहण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिल्वतीर्थ तलाव काही वर्षापूर्वी गाळ आणि मुरूम काढून खोल करण्यात आला आहे. तेव्हापासून बुडून जीवितहानी होण्याच्या घटना अधुनमधून होत आहेत.