जळगाव : जिल्ह्यात शिवसेनेला (उद्धव ठाकरे) अनेक पदाधिकारी सोडून गेल्याने मोठी गळती लागली आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जात असताना नव्याने संघटनात्मक बांधणीवर आता भर देण्यात आला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील जाहीर झाल्या आहेत.

जळगावमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव पत्कारावा लागल्यानंतर ठाकरे गटाची खूपच गलितगात्र अवस्था झाली आहे. तशाही परिस्थितीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसला बरोबर घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. त्यासाठी पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्याचे काम देखील प्राधान्याने केले जात आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करत असताना समाजातील विविध घटकांना कार्यकारिणीत स्थान देण्याची काळजी पक्ष श्रेष्ठींकडून घेण्यात आली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने जळगावमध्ये माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतीप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकताच जनआक्रोश मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा रेटा वाढवून प्रशासनाला किमान आश्वासने देण्यास भाग पाडले. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी लढणारा पक्ष म्हणून ठाकरे गटाची प्रतिमा आणखी उजळली आहे. त्याचा लाभ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांत होण्याची आशा ठाकरे गटाचे नेते व पदाधिकारी बाळगून आहेत.

नवनियुक्त पदाधिकारी (कंसात कार्यक्षेत्र)

संपर्क प्रमुख- कारभारी आहेर (अमळनेर), उपजिल्हा प्रमुख- किशोर महाले (एरंडोल तालुका), नितीन निळे (अमळनेर), उपजिल्हा संघटक- देवेंद्र देशमुख (अमळनेर), योगेश चौधरी (जळगाव), रवींद्र सोनवणे (यावल), रहीम गवळी (भुसावळ), उपजिल्हा समन्वयक- उल्हास भाररके (भुसावळ), विधानसभा क्षेत्रप्रमुख- वसंत पवार (अमळनेर), दौलतराव पाटील (एरंडोल), सुनील बडगुजर (चोपडा), राजेश महाजन (भुसावळ), तालका प्रमुख- प्रमोद घुगे (जळगाव), राजेंद्र मराठे (अमळनेर), शरद कोळी (यावल), नितीन महाजन (रावेर), उपेंद्र इंगळे (बोदवड), प्रभारी तालुका प्रमुख- प्रकाश पाटील (जामनेर), उपतालुका प्रमुख- सचिन चौधरी (जळगाव), समाधान महाजन (एरंडोल), दिलीप महाजन, रवी पाटील, विजय पाटील, देविदास मगरे (चोपडा), तालुका प्रसिद्धी प्रमुख- दीपक माळी (चोपडा), तालुका समन्वयक- भगवान धनगर (जळगाव), सुनील सोनवणे (चोपडा), तालुका संघटक- बाळू कोळी (चोपडा), शहर प्रमुख- सुनील भोई (वरणगाव उत्तर), उमाकांत झांबरे (वरणगाव दक्षिण), संदीप माळी (फैजपूर), ईश्वर महाजन (बोदवड), शेख मकबूल शेख फरीद (भुसावळ उत्तर-पूर्व), गणेश चौधरी (भुसावळ उत्तर-पश्चिम), योगेश बागूल (भुसावळ पश्चिम), शेतकरी सेना प्रमुख- दत