News Flash

वाशीतील पहिल्या इमारतीला वाढीव अडीच ‘एफएसआय’

नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या वाढीव एफएसआयचा प्रश्न गेली वीस वर्षे चर्चेत आहे.

नवी मुंबईतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींना सरकारने जास्तीत जास्त अडीच वाढीव चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर केल्यानंतर सहा महिन्यांनी पालिकेने वाशीतील पहिल्या आकाश सहकारी गृहनिर्माण संस्थेला दोन एफएसआय मंजूर केला आहे. नवी मुंबईत यापूर्वी दीड एफएसआयपेक्षा जास्त एफएसआय देण्यास सरकारची परवानगी नव्हती. अडीच वाढीव एफएसआयमुळे नवी मुंबईत भविष्यात सर्वसामान्यांसाठी निर्माण होणाऱ्या टॉवर संस्कृतीचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे.
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या वाढीव एफएसआयचा प्रश्न गेली वीस वर्षे चर्चेत आहे. अनेक निवडणुकांनी या एका प्रश्नाभोवती पिंगा घातला होता असे दिसून येते. आघाडी सरकारने या वाढीव एफएसआय मंजुरीचा पाया घातला तर युती सरकारने एप्रिल महिन्यात अडीच एफएसआयची मंजुरी देऊन त्यावर कळस चढवला. त्यामुळे सुमारे सव्वा लाख रहिवाशांचा जीव भांडय़ात पडला आहे. वाशी येथील जेएनवन-जेएनटू प्रकारातील इमारतींच्या जीर्ण अवस्थेमुळे हा प्रश्न निदान या वर्षी तरी मार्गी लागला. सरकारने अडीच एफएसआय मंजूर केल्यानंतर वाशीतील आठ इमारतींनी वाढीव एफएसआय मिळावा यासाठी पालिकेकडे प्रस्ताव सादर केले असून यात सेक्टर-१०मधील प्रस्तावित आकाश सोसायटीचा नव्याने दोन एफएसआयसाठी समावेश होता. या इमारतीला दीड एफएसआय यापूर्वीच मिळाला असून रहिवाशांची दोन एफएसआयची मागणी केली होती. या परिसरातील पायाभूत सुविधा आणि वाढत्या लोकसंख्येचा सुविधांवर पडणारा ताण यावरून हे प्रकरण सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे सादर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 12:01 am

Web Title: first building in vashi get 2 5 extra fsi
टॅग : Fsi
Next Stories
1 उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीखाली अनधिकृत बांधकामांचे पेव
2 रेल्वे स्थानके हस्तांतरणात मध्य रेल्वेचा चालढकलपणा
3 नवी मुंबईत खोदकामांमुळे डोकेदुखी
Just Now!
X