News Flash

उरणमधील वेश्वी परिसरात जलवाहिनी फुटली

तालुक्यातील वेश्वी परिसरात जलवाहिनी फुटल्याने दोन दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.

तालुक्यातील वेश्वी परिसरात जलवाहिनी फुटल्याने दोन दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. या संदर्भात उरणच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर ग्रामसेविका यांनी जलवाहिनी दुरुस्त केली असल्याचा दावा केला आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनींवरून गावासाठी घेतलेल्या जलवाहिनीवरून डंपर गेल्याने जलवाहिनी फुटून पाणी रस्त्यातून वाहून गेले.
या संदर्भात गटविकास अधिकारी वाय. एम. प्रभे यांनी ग्रामसेवकांना याचा जाब विचारला आहे. तर वेश्वीच्या ग्रामसेविका सरोज पाटील यांनी दुरुस्त करण्यात आलेली होती, मात्र पुन्हा एकदा फुटली असावी, अशी माहिती दिली. ती दुरुस्त करून पाणी गळती थांबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 12:13 am

Web Title: water pipeline broken in uran
Next Stories
1 दिवाळीत  सिडकोची ११ हजार घरे
2 सिडकोची बेकायदा बांधकामांवर कारवाई
3 दिघ्यातील नऊ इमारतींवरील  कारवाईसाठी ९४ लाखांचा खर्च
Just Now!
X