पनवेल : वडीलांनी दिड लाख रुपयांचा आयफोन न दिल्याने १८ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कामोठे येथील सेक्टर २० मध्ये दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेमुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सेक्टर २० येथे राहणारा किशोर हा नववी इयत्तेपर्यंत शिकला. त्यानंतर त्याने अर्धवट शाळा सोडली.

हेही वाचा >>> पनवेलमध्ये २०० खाटांचे सरकारी रुग्णालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही दिवसांपासून किशोरने त्याच्या वडिलांकडे दिड लाख रुपयांचा आयफोन पाहीजे अशी मागणी केली होती. वडीलांनी सुद्धा किशोरच्या मागणीचा विचार करुन त्याला दूस-या कंपनीचा फोन खरेदी करुन दिला. परंतू किशोरने आयफोन न दिल्याने अखेर घरात कोणीही नसताना आत्महत्येचा पर्याय निवडला. याबाबत कामोठे पोलीसांनी किशोरच्या पालकांकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी घडलेला प्रकार वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजय कांबळे यांच्याकडे सांगीतला. किशोरला अजून दोन भाऊ आहेत. किशोरचे लाड घऱातील सर्वच करत होते. तो मागील अनेक दिवस वडील आयफोन देत नसल्याने रागाने भांडण करुन फोन घेऊन द्या, अशी सातत्याने मागणी करत होता.