खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून नवी मुंबई महानगरपालिकेस २००८-०९ पासून क्रीडा क्षेत्रासाठी जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यामुळे या नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांतील खेळाडूंना थेट विभागीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळत असून यामधून देशपातळीवर शहराचा नावलौकिक वाढविणारे खेळाडू घडतील असा विश्वास क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>लग्नाचे आमिष दाखवून सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून सहकारी महिलेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांच्या सहयोगाने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी उपआयुक्त सोमनाथ पोटरे आपले मनोगत व्यक्त करीत होते. नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात आयोजित या कार्यक्रमास शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुसकर, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ठाणे जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा कार्यकारिणी समिती सदस्य पुरूषोत्तम पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा >>>विधी शाखेच्या ऑनलाईन परीक्षेत बनावट परीक्षार्थी बसवून उत्तीर्ण; आई विरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चा शुभारंभ फादर ॲग्नेल वाशी आणि एमजीएम नेरूळ या दोन शाळांच्या संघांमधील १९ वर्षाखालील फुटबॉल सामन्यापासून करण्यात आला. भारतात नुकत्याच संपन्न झालेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२२ मध्येनवी मुंबई हे देखील यजमान शहर होते. जगभरातून आलेल्या विविध देशांच्या संघांतील महिला फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षकांनी नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळ येथे विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणातील व्यवस्थेचे त्याठिकाणी सराव करून मुक्तकंठाने कौतुक केले होते. याच मैदानात हा शुभारंभाचा सामना खेळविण्यात आला.

हेही वाचा >>>रेलिगेयर आरोग्य विमा कंपनीविरोधात नवी मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २३४ शाळा सहभागी झाल्या असून ३० हजाराहून अधिक गुणवंत विद्यार्थी खेळाड़ू या स्पर्धेमधून ४८ क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन घडविणार आहेत. फुटबॉलप्रमाणेच टेबल टेनिस, क्रिकेट, जलतरण, खो-खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, रायफल शुटींग, व्हॉलीबॉल, शुटिंगबॉल, ज्युदो, किक् बॉक्सिंग अशा ४८ क्रीडाप्रकारांचा या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश आहे. या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असून या माध्यमातून नवी मुंबईतील विद्यार्थी खेळाडूंना आपली गुणवत्ता व क्षमता सिध्द करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.