नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आल्याने शासकीय आस्थापनांनी शहरातील बेकायदा फलकांवर नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरांत जोरदार कारवाई करत दंडही वसूल केला आहे. त्यामुळे आता शहरातील बॅनरबाजीला आळा बसला आहे.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वच पक्षांनी आपल्यापरीने शक्तीप्रदर्शन करुन मेळावे, सभा यांच्या माध्यमातून राजकीय घडामोडींना शहरात वेग आला होता. मेळावे, सभा , रोजगार मेळावे, महिला मोर्चा, नारी शक्ती यात्रा अशा विविध राजकीय उपक्रमांना वेग आला असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे सर्वच शहरांत फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र होते. त्यातून फुकटी फलकबाजी बोकाळली होती. परंतू शनिवारी आचारसंहिता लागताच पालिकेने मागील दोन दिवसांपासून धडक कारवाई करत शहरातील फलक हटवले आहेत.

wardha lok sabha seat, Special Facilities, polling in wardha, Set Up for Voters, Hirakni Rooms, Lactating Mothers, Hirakni Rooms for Lactating Mothers, marathi news,
वर्धा : हिरकणी कक्ष घेत आहेत लक्ष वेधून!
42 gangster tadipaar from pune city
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी शहरातील ४२ गुंड तडीपार
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

हेही वाचा…पनवेल: तरुणीला बनावट अश्लील छायाचित्र पाठवले, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई शहरात चौकाचौकांत फुकट्या बॅनरबाजीमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचत पालिकेच्या सर्वच विभागांतील चौकांचे विद्रुपीकरण होत असताना पाहायला मिळत होते. पामबीच मार्गावरही मोठ्या प्रमाणात फलकबाजी पाहायला मिळत होती. एखादा राजकीय पक्षाचा कार्यक्रम असला की गल्लीबोळातला कार्यकर्ताही बॅनरबाजी करतो, परंतू शहरात फलक, बॅनर लावताना त्याला नियमावली असून फलकाच्या आकारानुसार दरआकारणी होणे गरजेचे आहे. परंतू असे होताना दिसत नव्हते. आता मात्र आचारसंहितेमुळे पालिकेने धडक कारवाई करत हजारो फलक हटवले असून अनेकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

आचारसंहिता लागल्यामुळे आता फुकट्या बॅनरबाजीला आळा बसला असून शहरातील बेकायदा राजकीय फलक, झेंडे हटवण्यात आले आहेत. तसेच विविध पक्षीय फलकही झाकण्यात आले आहेत. आचारसंहिता प्रमुखांची नेमणूक करत त्यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. बेलापूर विधानसभाक्षेत्राची जबाबदारी सोमनाथ पोटरे, तर ऐरोली विधानसभा क्षेत्रातील जबाबदारी डॉ. कैलास गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असून कारवाईत हजारो फलक हटवण्यात आले आहेत.

हेही वाचा…नवी मुंबई : अल्पवयीन असल्यापासून घरफोडी… अट्टल आरोपीला अटक 

पनवेल महापालिका क्षेत्रातही रविवारी रात्रीपर्यंत आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या २४ तासांत राजकीय पक्षांच्या अवैध फलकबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख हे रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसले. आयुक्तांच्या थेट सहभागामुळे शहर विद्रुप करणाऱ्य अवैध फलकबाजीचा सूपडा साफ झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.

चारही प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन ही कारवाई केली. नेत्यांनी राजकीय कार्यालयांवरील झेंडे स्वत: काढून टाकले तसेच कार्यालयांवरील पाट्यांवरील पक्षांची चिन्हे व पक्षाचे नाव झाकून टाकले.

आयुक्त देशमुख यांनी रविवारी पाहणी दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत सुमारे ४५०० राजकीय पक्षांचे झेंडे, ३२०० लहान-मोठे फलक, विना परवानगी २५०० मोठे फलक जप्त केले आहेत. कळंबोलीत काही ठिकाणी फलकबाजी असल्याने आयुक्त देशमुख यांनी प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या कंटेनर कार्यालयांवर पालिकेच्या पथकाने कारवाई केली. विशेष म्हणजे शिंदे गट शिवसेनेने शनिवारी ‘धर्मवीर वाहतूक सेने’चे कार्यालयाचे उद्घाटन ठाण्यातील बड्या पुढाऱ्यांच्या हस्ते केले होते. सेनेला २४ तासांत हे कार्यालय बंद करावे लागले.

हेही वाचा…पनवेलमध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी करताना अवैध फलकबाजीचा सूपडा साफ

नवी मुंबई पालिकेने केलेली कारवाई

प्रकार संख्या

सामासिक जागांचा वापर १९०

अनधिकृत झोपड्या १६

अनधिकृत फेरीवाल ५६७८

अनधिकृतपणे वाहने पार्किंग ११५

बॅनर्स, होर्डिंग १९७७

दंडात्मक कारवाई ८,४२,४००