नवी मुंबई : देशातील सर्वाधिक व्यस्त मार्ग असलेल्या शीव पनवेल मार्गावर वाहतूक पोलीस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, वाहतूक कोंडीस कारण असलेल्या वाहनांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. गुरुवारीही अशाच पद्धतीने एका प्रवासी बस मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शीव पनवेल मार्गावर एखाद्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होत असेल, तर वाहन मालक आणि चालकावर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशा प्रकारे यापूर्वी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गुरुवारी तिसऱ्या वाहन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सकाळी एक टेम्पो पलटी झाला. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. हा टेम्पो पोलिसांकडून बाजूला करण्यात आला. याच वाहतूक कोंडीत ९ वाजता शीव पनवेल मार्गावर खिंडीनजीक एम.एच. ०४ जी ९२७० ही प्रवासी बस बंद पडली. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली. याची माहिती मिळाल्यावर वाहतूक पोलीस सदर ठिकाणी गेले. मात्र, त्या ठिकाणी गाडी चालक नसल्याने गाडी क्रमांकावरून मालकाचा क्रमांक मिळवला. त्यांना फोन करून सांगितल्यावर त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीची माहिती काढत असताना सदर गाडीचा फिटनेस संपलेला असतानाही गाडी चालवली जात असल्याचे लक्षात आले. दरम्यान, यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग गेली होती. मालक व चालक यांच्या निष्काळजीमुळे वाहनाचा फिटनेस संपला. असे असतानादेखील त्यांनी वाहन रहदारीच्या ठिकाणी आणले व ते बंद पडले. या पार्श्वभूमीवर लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणे, वाहतूक कोंडीस कारण ठरणे म्हणून वाहन चालक आणि मालक दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – नवी मुंबई महानगरपालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर; जुन्या प्रकल्पांनाच नवीन झळाळी

हेही वाचा – नवी मुंबई परिवाहनाचा जुन्याच प्रकल्पावर भर; इंधन बचत करूनही तोटा कमी नाहीच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिझेल, फिटनेस संपल्यानंतरही वाहन रस्त्यावर चालवणे अशा मानवी चुका झाल्याने गुन्हा नोंद केला गेला आहे. अपघाती वाहने किवा तांत्रिक बिघाड झाल्यावर वाहन बंद पडले असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी सांगितले.