नवी मुंबई : आज संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास तुर्भे एमआयडीसीतील एका कापड कारखान्याला भीषण आग लागली असून, आत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कापड कारखाना असल्याने काही क्षणात पूर्ण कारखान्यात आग पसरली असून, पूर्ण परिसरात धूर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नवी मुंबई : उद्यानात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

हेही वाचा – नवी मुंबई : शाळांत क्रमांकासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा, मागण्या मान्य न केल्यास परीक्षेवर बहिष्काराचा इशारा

आकाशात उडणारे धुराचे लोट हे सुमारे तीन ते चार किलोमीटर दूर असलेल्या सायन पनवेल महामार्गावरून दिसत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विलास घोरपडे यांनी दिली. आग विझवण्यासाठी वाशी, नेरूळ, सीबीडी, तसेच एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणा कामाला लागली आहे. रेडीमेड कापडे बनवणाऱ्या कंपनीच्या कारखान्याला आग लागली असून, तुर्भे एमआयडीसीतील डी ८४ भूखंडावर हा कारखाना आहे. आगीच्या ठिकाणी आम्ही नुकतेच पोहोचलो असून, अद्याप आत कोणी आहे किंवा नाही, आदी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, अशी माहिती वाशी अग्निशमन विभागाने दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A massive fire broke out at a textile factory in turbhe midc navi mumbai ssb
First published on: 15-02-2023 at 18:11 IST