scorecardresearch

नवी मुंबई : अखेर ‘त्या’ वादग्रस्त अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई

नेरुळ येथील नवी मुंबई महानगरपालिका उद्यानाच्या जागेत व लगत परिसरात अनधिकृतपणे झोपडपट्टी आहे. या ठिकाणी सुमारे ३०० झोपड्या असून अनेक वर्षापासून हळू हळू करीत यात वाढ झाली आहे.

Action on controversial slum in Nerul
नेरूळ येथील  वादग्रस्त झोपडपट्टीवर कारवाई

 नेरूळ येथील  वादग्रस्त झोपडपट्टीवर अखेर कारवाई करण्यात सुरु करण्यात आली आहे. आजच्या आज पूर्ण झोपडपट्टी काढून टाकण्याची तंबीच आयुक्तांनी दिली असल्याचे बोलले जात आहे. याला कुठल्याही राजकीय बड्या नेत्याचा विरोधासाठी फोन येईल म्हणून कारवाई समंधीत अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवलेल्याची चर्चा होत होती.

हेही वाचा- पनवेल : श्वान सांभाळ केंद्रात श्वनाचा मृत्यूमुळे व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

नेरूळ बालाजी मंदिर  सेक्टर २८  (नवीन) येथील साहिल सृष्टी आणि शिवतेज प्लाझा इमारतीच्या मागील बाजूस नवी मुंबई महानगरपालिका उद्यान आहे. याच उद्यानाच्या जागेत व लगत परिसरात अनधिकृतपणे असलेली झोपडपट्टी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमणात होणाऱ्या अवैध धंद्यांनी स्थानिक रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. गांजा, गुटका सहज येथे मिळत होता. शिवाय परिसरात गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. तसेच रात्री अपरात्री मद्यपींचा रस्त्यावर आरडा ओरडा गलिच्छ शिवीगाळ नित्याचीच बाब झाली होती. त्यातच काही दिवसांपूर्वी एका युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या तीन तरुणांना विचारणा केल्यावर तिघेही पळून गेले होते. याबाबत सामान्य नागरिक ते अनेक राजकीय पक्षांनी झोपडपट्टी हटवण्याची मागणी केली होती. मात्र अतिक्रमण विभाग अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते. अखेर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी समजले जाणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा यांनी २४ फेब्रुवारीला मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास ही गंभीर परिस्थिती आणून दिली. त्यावर कारवाईचे आश्वासन दिले आणि आज ते प्रत्यक्षात उतरले.

हेही वाचा- सीवूडस् येथील न्युरोजन हॉस्पिटलवरील परवाना रद्द करण्याच्या कारवाईनंतर उलटसुलट चर्चांना उधाण

आज (बुधवारी) सकाळी अकराच्या सुमारास प्रचंड पोलीस फौज फाटा घेत या झोपडपट्टीवर कारवाई सुरु करण्यात आली. सुरुवातीला झोपडपट्टी वासियान्चा विरोधा झाला मात्र पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावल्याने दुपारपर्यंत कारवाई सुरु होती. मात्र जेसीबीमध्ये काही बिधाद झाल्याने सुमारे एक तास कारवाई थांबवण्यात आली होती. दुपारनंतर ती सुरु करण्यात येणार असल्याची माहित उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली.

या ठिकाणी सुमारे ३०० झोपड्या असून अनेक वर्षापासून हळू हळू करीत यात वाढ झाली आहे. मनपाने अखेर यावर कारवाई केली. अशी माहिती झोपडपट्टी विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप सरचिटणीस मंगला घरत यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 14:00 IST