पूनम सकपाळ

कासाडी नदीत वर्षानुवर्षे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामधील हानिकारक रायासन सोडून प्रदूषण केले जात आहे. त्यामुळे ही नदी नेहमीच प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे.कासाडी नदीमध्ये रसायन सोडले जाते अशा तक्रारी रायगड महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला प्राप्त झाल्या होत्या . त्यानुसार प्रदूषण मंडळाने पंधरा दिवस तळोजा एमआयडीसी भागात नजर ठेवून सापळा रचला होता . अखेर शनिवारी दि.१७ला पहाटे ४.३०च्या दरम्यान एक सांशीयत टँकर कासाडी नदी पात्रात रसायन सोडताना निदर्शनास आला. दरम्यान प्रदूषण मंडळाने रंगेहाथ पकडून टँकर मालक आणि चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली असून पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे. तसेच महाड मधील हार्ट्ज ऑरगॅनिक कंपनीला नोटीस बाजाविण्यात आली आहे.

कासाडी नदीत रसायनमिश्रित पाणी सोडीले जाते. त्यामुळे पात्रातील पाणी दूषित झाले आहे. त्याचबरोबर मासे आणि इतर जलचर जीव धोक्यात आले आहेत. औद्योगिक कंपन्यांकडून रासायनिकयुक्त सांडपाणी हे नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते, तसेच पाण्याला कोणताही रंग नसतो हे माहिती आहे, मात्र या नदीतील पाण्याला नेहमी वेग वेगळे रंग पाहावयास मिळतात. पाण्याचा कधी काळा, हिरवा , तांबडा, निळा असे अनेक रंग दिसतात. प्रदूषण विळख्यात अडकलेल्या कासाडी नदी प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने प्रदूषण मंडळाने तळोजा एमआयडीसी भागातील पंधरा दिवस सापळा रचून नजर ठेवण्यात आली होती.अखेर आज शनिवारी पहाटे ४.३०च्या सुमारास एक संशयित टँकर नदी पत्राकडे जाताना निदर्शनास आला. या टँकर मधून बेकायदेशीर हिरव्या रंगाचे रसायन सोडताना निदर्शनास आले. त्यानंतर हे रासायन सोडणाऱ्या टँकर चालक आणि मालक यांना रंगेहाथ पकडले. टँकर मालक बलवंत सिंग दर्शन भुल्लर आणि चालक बलबिर रामसिंग (६० वर्षे) यांच्यावर कारवाई करण्यात आली असून पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे. भारतीय दंड संहिता १८६० कलम ३३६ ,२६९,२७०,२७८,१५अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टॅंकर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आला असून दोघांना ही अटक केले आहे. यादरम्यान सोडण्यात आलेल्या रसायनाची तपासणी केली असता सोडलेलं रसायन हे सल्फ्युरिक ऍसिड असून त्याचा पीएच १ते २ असा आढळुन आला असून हानिकारक असल्याचे समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्ट्ज ऑरगॅनिक कंपनीला बंदची नोटीस
कासाडी नदीपात्रात सोडलेलं हानिकारक सल्फ्युरिक ऍसिड सोडणाऱ्या महाडच्या हार्ट्ज ऑरगॅनिक कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नोटीस बजाविली असून दोन दिवसांत याबाबत खुलासा मागविण्यात आलेला आहे. दोन दिवसांत खुलासा न दिल्यास कंपनी बंद करण्यात येईल , अशी माहिती रायगड महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उप- प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी दिली आहे.