उरण : शहरातील चारफाटा येथील चौकात मंगळवारी सकाळी एका रुग्णवाहिकेला अपघात झाला असून या अपघातात रिक्षा आणि रुग्णवाहिकेच नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. तसेच वाहनात रुग्ण नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
हेही वाचा- नवी मुंबई: एपीएमसी बाजाराच्या आवारात कचऱ्याचे ढीग; महापालिकेचे दुर्लक्ष
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजता नवीन शेवा मार्गाने उरण शहरात जाण्यासाठी एक रुग्णवाहिका आली होती. या रुग्णवाहिकेने येथील चारफाटा चौकातून वळण घेतला असता रुग्णवाहिकेच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र ही वेळ सकाळची असल्याने चारफाट्यावर नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती त्यामुळे जादाचे नुकसान टळले कारण या चौकात मोठ्या प्रमाणात नागरिकांची तसेच वाहनाचीही गर्दी असते.