पनवेल : पनवेल तालुक्यातील देवद ग्रामपंचायतीमध्ये चोरांनी चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. लाखो रुपयांचे महसुली उत्पन्न असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये चोरी केली तर मोठे घबाड हाती लागेल असे चोरांना वाटले. मात्र त्यांचे नियोजन पूर्णपणे फसले.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

चोरटयांनी चोरीसाठी अगदी पद्धतशीर नियोजन केले होते. ठरवल्याप्रमाणे चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीचे नियोजन केले. मध्यरात्री ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील खिडकीचे लोखंडी गज कापण्यात चोरटे यशस्वी झाले. त्यानंतर चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. ग्रामपंयातीमधील कपाटाच्या दरवाज्याला कुलूप असल्याने कसेबसे कपाटाचे दार उघडण्यात आले.

हेही वाचा : पनवेल: लग्नाचे आमिष दाखवत महिला डॉक्टरची फसवणूक, आरोपीने बनवले अश्लिल व्हिडीओ, गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र एवढे परिश्रम घेतल्यावर चोरट्यांना कपाटात काहीच सापडले नाही. त्यानंतर चोरट्यांनी कार्यालयातील टेबलांकडे त्यांचा मोर्चा वळविला. टेबलांचे ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्येही काहीच न मिळाल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कागदपत्र त्यांनी विस्कळीत केली. चोरट्यांना तिथून रिकाम्या हाताने ग्रामपंयात कार्यालयातून परतावे लागले. या संपूर्ण घटनेनंतर सोमवारी सकाळी देवद ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक धनंजय निकम हे कार्यालयात आठवड्यातील पहिल्या दिवशी कामाला आले असता त्यांनी सगळीकडे पसरलेले कागदपत्रे पाहून थेट पोलीस ठाणे गाठले. खांदेश्वर पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार ग्रामसेवक निकम यांनी केली. गेल्या चार पाच दिवसात या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे ग्रामसेवक निकम यांनी सांगितले.