उरण : आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली उरण एज्युकेशन सोसायटी या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या विद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रासाठी ५५० रुपये आकारण्यात येत आहेत. या विद्यालयाच्या मनमानी विरोधात पालकांनी जाब विचारला होता. आता उरणचे आमदार महेश बालदी आणि भाजपानेही पालकांची साथ देत याचा निषेध केला आहे. तसेच विद्यालयाने लावलेले जादाचे शुल्क पालकांनी भरू नये असे आवाहन केले आहे. तसे फलक उरणच्या बाजारात भाजपने लावले आहेत.
हेही वाचा : नवी मुंबई परिवहन विभागाचे नियोजन कसे? चालते ? वाशीत ‘लोकसत्ता शहरभान’चे आयोजन
या शुल्क वाढीच्या विरोधात पालकांनी पंचायत समितीच्या कार्यालयावर मोर्चा ही काढला होता. विद्यालयाने ओळखपत्रासाठी केलेली शुल्क वाढ ही अन्यायकारक आहे. त्यामुळे पालकांनी ती भरू नये असे आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.