लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण नवी मुंबई शहरातही राम नामाचा जयघोष पाहायला मिळाला. संपूर्ण शहरात बेलापूर ते दिघा परिसरातील विविध मंदिरांमध्ये राम नामाच्या जयघोषाचे चित्र आहे.
सकाळपासूनच शहरातील विविध मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात पूजा , होम हवन तसेच कलश दिंडी काढत मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकानी राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वच मंदिरांमध्ये गर्दी केली होती.
आणखी वाचा-अटलसेतुवर पहिला अपघात? वाहनाने पुलाच्या दुभाजकाला दिली धडक
नवी मुंबई शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या बेलापूर गावच्या राम मंदिरात रामभक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सकाळपासूनच पूजा अर्चा सुरु होती. नवी मुंबई शहरातील बेलापूर नेरूळ सानपाडा वाशी कोपरखैरणे ऐरोली घणसोली अशा सर्वच विभागात असलेल्या विविध मंदिरांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.