पनवेल : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जोडणा-या अटलसेतूमुळे द्रोणागिरीचे महत्व वाढले आहे. सिडको महामंडळाने प्रजासत्ताक दिनी आधुनिक आणि नियोजित वसाहतींमध्ये घर खरेदी करण्याची संधी सर्वसामान्यांना दिली आहे. सिडको महामंडळाने द्रोणागिरी आणि तळोजा या परिसरातील ३३२२ सदनिकांची सोडतीची घोषणा केली असून ३० जानेवारी ते २७ मार्च या दरम्यान इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने या सोडतीमध्ये अर्ज करता येईल. या सोडतीमध्ये द्रोणागिरी सेक्टर ११ व १२ या परिसरात २२ लाख ते ३० लाख रुपयांमध्ये लाभार्थ्यांना सदनिका घेण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा…पनवेल पालिकेविरोधात प्रकल्पग्रस्तांचे मंगळवारपासून धरणे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक दुर्बल घटकासाठी २५.८१ चौरस मीटरची सदनिका २२ लाख १८ हजार रुपयांमध्ये तसेच २९.८२ चौरस मीटरची सदनिका सर्वसाधारण प्रवर्गामधील लाभार्थ्यांना ३० लाख १७ हजारांना मिळणार आहे. तसेच तळोजा नोडमधील सेक्टर २१, २२, २७, ३४, ३६, ३७ या परिसरातील सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सर्वसाधारण प्रवर्गांसाठी राखीव आहेत. २२ लाख ते ३४ लाख रुपयांमध्ये या सदनिका सोडतीमध्ये लाभार्थ्यांना मिळू शकणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी उमेदवारांना केंद्र शासनाचे दीड लाख आणि राज्य शासनाचे एक लाख असे अनुदान संबंधित सोडतीच्या योजनेत मिळणार आहेत.