पनवेल, उरण – अहमदाबाद ते लंडन या विमान प्रवासात गुरुवारी होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये पनवेल तालुक्यातील न्हावा गावात राहणारी २३ वर्षीय हवाई सुंदरी मैथिली पाटील या सुद्धा बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने न्हावा गावासह पनवेल व उरणमधील ग्रामस्थ चिंतेत आहेत.

दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून मैथिली या काम करत असल्याची माहिती पनवेलचे भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी दिली. मैथिली यांचे वडील मोरेश्वर हे ओएनजीसीमध्ये नोकरी करतात. बुधवारी मैथिली या घरी कुटूंबियांसोबत होत्या. गुरुवारी मैथिली हीची नेमणूक अहमदाबाद ते लंडन विमान क्रमांक ए १ – १७१ यावर असल्याने त्यांनी गुरुवारी सकाळी मुंबई मार्गे अहमदाबाद असा प्रवास करुन त्या विमानात कर्तव्य बजावण्यासाठी गेल्या होत्या. दुपारनंतर विमान दुर्घटनेच्या बातमीनंतर मैथिली हीचे कुटूंबिय चिंतेत होती. मैथिली यांची कोणतीही माहिती मिळत नसल्याने मैथिली हीच्या कुटूंबियांनी तीचा शोध घेण्यासाठी कुटूंबिय अहमदाबादकडे रवाना झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैथिली हीचे सुरूवातीचे शिक्षण टी.एस. रेहमान इन्स्टीट्यूटमधून झाले. त्यानंतर त्यांनी हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची निवड एअर इंडीया कंपनीमध्ये झाली. मैथिली या आईवडील आणि बहिण भावासोबत येथे राहते. मैथिलीच्या बेपत्ता होण्याचे वृत्त समजताच तीला ओळखणारे चिंतेत आहेत.