नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतर १६ जूनपासून शहरातील शाळांची घंटा घणघणणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी १ली ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाद्वारे राज्यशासनाकडून मिळालेल्या मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना एकूण ४ लाख,२९ हजार ७१८ पुसतकांचे वाटप होणार आहे.

राज्यभरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असताना नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या मात्र दरवर्षी वाढत असते. नवी मुंबई महापालिकेमार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात. तर पालिकेद्वारे पूर्वप्राथमिक वर्गही चालवले जातात. पालिकेच्या प्राथमिक विभागाप्रमाणेच माध्यमिक विभागाच्या विविध माध्यमाच्या शाळा आहेत. पालिकेच्या शहरात तीन सीबीएसई शाळाही आहेत. महापालिका शाळांचे नुकतेच निकालही चांगले लागले असून शाळांचा दर्जाही सुधारण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. पालिकेला ३ जूनला पुस्तके प्राप्त झाली असून १० जूनपर्यंत सर्व पुस्तके शाळांपर्यंत दिली जात आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येईल असे नियोजन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघरत्ना खिल्लारे,उपायुक्त शिक्षण विभाग

शासनाकडून पालिकेकडे १ ली ते ८ वीच्या विद्यार्थांना वाटपासाठी प्राप्त झालेल्या पुस्तकांची संख्या- ३,६४,३४८ पालिकेकडून ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना वाटप होणारी एकूण पुस्तके- ६५३७०