पनवेल ः करंजाडे वसाहतीपासून पनवेल रेल्वेस्थानकाला जोडणारी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेची ७६ क्रमांकाच्या बससेवेला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. करंजाडे ते पनवेल रेल्वेस्थानक या पल्यासाठी ११ रुपयांचे तिकीट भाडे असले तरी विलंबाच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले आहेत. ७६ क्रमांकाच्या मार्गात सर्वात मोठी वाहतूक कोंडी पनवेल शहरातील उरणनाका चौक आणि स्थानक परिसरात बस निघण्यासाठी तीन आसनी रिक्षांमुळे प्रवाशांना अनेक मिनिटांचा विलंब प्रवास करावा लागत आहे.

बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजाडे वसाहतीमधून एनएमएमटीच्या क्रमांक ७६ बसला पनवेल स्थानकामध्ये पोहोचण्यासाठी अर्धा तासांचा विलंब झाला. उरणनाका येथील मासेबाजारामुळे उरण नाका येथे वाहतूक कोंडी झाली होती. पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस कर्मचारी व वार्डन तैनात केले आहेत. दररोज चुकीच्या पद्धतीने वाहने उभी केल्याने कारवाई पोलीस करत असतात. परंतु पोलीस विभागाचा हा दावा पोकळा असून पोलीस कर्मचारी कारवाईसाठी तत्पर असल्यास वाहतूक कोंडी होतेच कशी असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे करंजाडे येथून एनएमएमटी बस वाहतूक कोंडीमध्ये अडकत असल्याने प्रवाशांनी तीन आसनी रिक्षातून प्रती आसन २० रुपये देऊन करंजाडे ते पनवेल स्थानक या पल्यावर प्रवास करतात. मात्र तीन आसनी रिक्षांनासुद्धा वाहतूक कोंडीचा फटका उरण नाका येथे बसतो. अनेक वर्षे झाले तरी एनएमएमटी बसच्या फेऱ्या वाढत नाही. तीन आसनी रिक्षांची संख्या रेल्वेस्थानक ते करंजाडे या पल्यावर आरटीओने वाढविली पाहीजे. आरटीओ विभागाने बसच्या फेऱ्या वाढविण्यासाठी पुढाकार घेऊन सिडको मंडळ, एनएमएमटी व एसटी प्रशासन यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक लावून प्रवाशांना माफक दरात सुलभ प्रवास करता येण्यासाठी पर्याय दिले पाहिजेत. परंतु तसे होताना दिसत नाही. 

navi mumbai cracks on flyover
नवी मुंबई: २६ वर्षांत उड्डाण पुलाला तडे, वाहतूक बंद 
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Panvel Demolition Video
“हरले म्हणून गरिबाला त्रास..”,पनवेलमध्ये झालेल्या कारवाईचा संबंध योगी आदित्यनाथ यांच्याशी का जोडला जातोय? पाहा Video
panvel hoarding collapsed marathi news
पनवेल: पंधरा दिवसांपूर्वी सुरक्षित असलेला फलक पडलाच कसा
Panvel, karanjade Residents, Panvel s karanjade Residents Protest Over Water Scarcity, karanjade Citizens March Water Scarcity, panvel news, water scarcity news
पनवेल : करंजाडेवासियांचे पाणी प्रश्नासाठी आंदोलन
navi mumbai crime news
नवी मुंबई: माझ्या मुलाला न्याय द्या, आईची आर्जवी मागणी; मात्र शाळा प्रशासन, पोलीस आणि रुग्णालय उदासीन 
Creek Bridge Near Vashi Toll Gate, Vashi Toll Gate, work of Creek Bridge Near Vashi Toll Gate in final stage, Mumbai Pune Commuters, Mumbai pune expressway, navi Mumbai, vashi, vashi news,
नवी मुंबई : तिसरा खाडी पूल दृष्टिपथात, एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात
Mumbai local 24 years ago old video goes viral
मुंबई लोकलमध्ये २५ वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? सोशल मीडियावर व्हायरल झालेला Video पाहाच

हेही वाचा – उरण : ओएनजीसी’च्या तेलगळतीग्रस्तांना दीड कोटींची नुकसानभरपाई

नोकरदार महिलांसह इतर प्रवाशांना करंजाडे वसाहत ते पनवेल स्थानक या पल्यावर प्रवास करणे हे जिकरीचे झाले आहे. रात्रीच्यावेळी तर बस एकाबाजूला कलंडते एवढी गर्दी ७६ क्रमांकाच्या बसमध्ये असते. ११ रुपयांचा हा माफक तिकीटदरातील प्रवास अजिबात सुरक्षित नसतो. – स्वाती सावंत, प्रवासी, करंजाडे

करंजाडे वसाहतीचा परिसर उरण विधानसभा मतदारसंघात येत असल्याने उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी मागील पाच वर्षांत बसफेऱ्या वाढविण्यासाठी बैठक घेऊन एनएमएमटी बसच्या फेऱ्या न वाढविल्याने प्रवासी संताप व्यक्त करतात. राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन बालदी यांनी अनेक कामे मार्गी लावली. परंतु करंजाडेवासीयांचा बसफेऱ्या वाढविण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बालदी सोडविण्यात असमर्थ ठरले. 

हेही वाचा – नवी मुंबईतील पोलीस भरती दोन दिवस पुढे ढकलली

वाहतूक पोलीस विभागाने पनवेल शहरातील उरणनाका येथील वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तीन आसनी रिक्षांनी चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभी केल्याने मंंगळवारीच चार रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांचे कारवाईतील सातत्य सुरुच आहे. –  संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक विभाग