उरण : उरण मधील शेती बहरु लागली आहे. मात्र शेतीला खते देण्याच्या वेळीच तालुक्यात खतांचा तुटवडदा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक संकटावर मात करीत उगवलेली पीके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी वर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे. खरीप हंगामात घेण्यात येत असलेल्या भात रोपांच्या उत्तम वाढीसाठी शेतकरी खतांचा वापर करतात. मात्र, सध्या या भागात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकरी करत आहेत. खत विक्रेत्यांनी बफर स्टॉकमधून शेतकऱ्यांना खतांचे वाटप करावे, असे आवाहन कृषी विभाग अधिकारी एस. जी. गटकळ यांनी केले आहे.
तालुक्यात भात लावणीची कामे आता शंभर टक्के पूर्णत्वास गेली आहेत. यावर्षी पावसाने वेळेपूर्वीच हजेरी लावली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनने हजेरी त्यामुळे शेतीच्या कामात मोठ्या अडचणी आल्या. शेतकऱ्यांना धूळ वाफ्याची पेरणी करता आली नाही, त्यामुळे येथील शेतकऱ्यांना चिखल पेरा करावा लागला.
बफर स्टॉकमधून खते देण्याचे आवाहन महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार तिबार भाताची पेरणी करावी लागली. मात्र, भातरोपांची कमतरता असल्यामुळे भात खाचरातील शेतकऱ्यांना शेतीची लागवड करण्यासाठी भातरोपे कमी पडली.दरम्यान, काही विरळ प्रमाणात शिल्लक राहिलेल्या तसेच आपली शेती ओसाड राहू नये, यासाठी अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांनी भाताची रोपे विकत आणून, त्या रोपांची लागवड आपल्या शेतात केली आहे. रविवार, ३ ऑगस्ट रोजी कोप्रोली येथे २५ टन खताची उरण तालुक्यात सध्या लागवडीखाली येत असलेल्या जमिनीसाठी खताची गरज आहे.
सध्या उरण, पनवेल तालुक्यांत कुठेही खते उपलब्ध नाहीत. कृषी विभागाकडून आरसीएफमध्ये खताची मागणी केली असता आरसीएफकडून २५ टन खत उरण तालुक्यातील शेतक-यांसाठी उपलब्ध झाले आहे. हा खताचा पुरवठा अपुरा आहे. आरसीएफकडून खत पुरवठा होईपर्यंत गरजेनुसार विक्रेत्यांनी लागणाऱ्या खतासाठी बफर स्टॉकचा वापर करून शेतकऱ्यांसाठी खते उपलब्ध करून देण्याचे आवाहन कृषी विभाग अधिकारी यांनी केली आहे. खत वाटपाच्या वेळी प्रत्येक शेतकऱ्याला खताच्या दोनच बॅगा देण्यात आल्या. त्यामुळे ते काही वेळात संपले, अनेक शेतकऱ्यांना वेळेवर विक्रेत्यांकडून खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिकांना खताची मात्रा देण्याची कामे खोळंबली आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.