सध्या रासायनिक खतांचा मारा करून उत्पादन वाढवले जात आहे. परंतु नैसर्गिक पद्धतीने उत्पादन वाढवून बळीराजाला सक्षम करता येईल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन दुबार पीक कसे घेता येईल. पायाभूत सुविधा पुरवणे याकडे राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले असून येणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

हेही वाचा- मशाल चिन्हांवर लढणाऱ्या उमेदवारांचा प्रचार करत होते बाळासाहेब; पाहा फोटो

वाशीत बाॅम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात पुरवठादार व खरेदी संस्थांची द्वैवार्षिक सभा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनाचे उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करून उत्पादन वाढवले जात आहे . परंतु रासायनिक खतामुळे कॅन्सर सारख्या आजारांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रण दिले जात आहे.

हेही वाचा- ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नव्या नावाचे शिंदे गटाचे पहिले कार्यालय नवी मुंबईत

रासायनिक ऐवजी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपारिक, नैसर्गिक शेती करून शेतकऱ्यांना दुबार पीक कसे घेता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आदिवासी विभागात १० लाख हेक्टरवर शेती व्यवसायाची व्यापकता वाढवण्याचे नियोजन आहे. सन १९८४ मध्ये देशामध्ये साडेपाच लाख तेल घाणे होते. परंतु आता केवळ पन्नास हजार तेल घाणे राहिले आहेत. देशाला ७०% तेल हे बाहेरून देशातून आयात करावे लागत आहे. तेलासाठी भारत देश मोठ्या प्रमाणावर इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे देशात परिणामी राज्यातच बळीराजाला सक्षम करून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिकाधिक उत्पादन कसे वाढवता याबाबत नियोजन सुरू आहे, असेही सत्तार म्हणाले.

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला उत्तम भाव आणि सुविधा युक्त बाजारपेठ, त्यासाठी शेतमालाचे करावे लागणारे मार्केटिंग या पायाभूत सुविधा देण्यासाठी आमच्या सरकारकडून येणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी विषयक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर निधी दिला जाईल. शेतकऱ्यांच्या रस्त्यावरील काटे मात्र जरुर दूर करणार असून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मध्यवर्ती बिंदू ठेवून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.