लोकसत्ता टीम
उरण : कचऱ्याच्या ढिगाना आगी लावून उरणच्या वेशीवर धुरांडे निर्माण केले जात आहेत. शनिवारी उरण – पनवेल मार्गावरील कोटनाका रेल्वे मार्गावर टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लावण्यात आल्याने प्रचंड धूर निर्माण झाला होता.
आणखी वाचा-उरणमधील ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
एकीकडेदिवसेंदिवस उरणच्या हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. त्यामुळे नागरिकांचा श्वास कोंडू लागला आहे. मात्र या गंभीर बनत चाललेल्या स्थितीकडे दुर्लक्ष केलं जात. उरण मधील ढासळणारी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे उरण मधील हवा गुणवत्ता जगात आणि देशात क्रमांक पटकावित आहे.