नवी मुंबई – मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून, हापूससह इतर आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मागील आठवड्यात ४ ते ६ डझन आंब्याची विक्री १५०० ते २५०० रुपयांना होत होती. आता ८०० ते २००० रुपयांवर विक्री होत असून, प्रतिडझन २०० – ५०० रुपयांनी उपलब्ध झाले आहेत. हापूस दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने खवय्ये मनसोक्त आनंद घेऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा हापूस आंब्याचे उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा केली जात होती. परंतु यंदाच्या हंगामाला लहरी हवामानाचा फटका बसल्याने यंदा अवघे १६ ते १८ टक्के हापूसचे उत्पादन आहे. अवकाळी पाऊस, हवामान बदल, उष्ण वातावरणाने इतर राज्य, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भागातील आंबा यावर्षी कमी आहे. आता हापूस आंब्याच्या हंगामाचा १० दिवसांचा कालावधी राहिला असून गेल्या तीन चार दिवसांपासून बाजारात कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगड येथील आंब्याची आवक वाढली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : अधिकाऱ्यांची नालेसफाईत हातसफाई, राजन विचारेंचे गंभीर आरोप

एपीएमसी बाजारात महाराष्ट्र राज्यातील ५० हजारांहून अधिक पेट्या दाखल होत आहेत, तर इतर राज्यातील ४० हजारांहून अधिक पेट्यांची आवक आहे. वातावरणात उष्णता वाढत आहे, त्यामुळे आंबा लवकर तयार होत असून बाजारात दाखल होत आहे. मार्चच्या तुलनेत परिपक्व आणि कमी दरात आंबे उपलब्ध होत आहेत. मे अखेरीपर्यंत बाजारात हापूस आंब्याची आवक राहील. मागील आठवड्यात ४-६ डझनला १५००-२५०० रुपये दर होता, तेच आता ८००-२००० रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ५ मध्ये दुकानाला भीषण आग

एपीएमसीत कोकणातील आवक वाढल्याने बाजारात मुबलक हापूस उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे. – संजय पानसरे, संचालक, एपीएमसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hapus mangoes cheap in navi mumbai ssb
First published on: 23-05-2023 at 17:22 IST