नियोजनबध्द वसवलेल्या नवी मुंबई शहरात अनियोजित पार्किंगचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न अधिक जटील होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंगची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. पार्किंगसाठी जागाच अपुऱ्या पडत असल्याने नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या पार्क करायच्या तरी कुठे असा प्रश्न पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> रुग्णालयासाठी उरण सामाजिक संस्थेची गांधीगिरी…

नवी मुंबई शहरात वाशी ते कोपरी पामबीच मार्गावर दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनत चालला असून बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगर लागताच रस्त्याच्या दुतर्फा पामबीच मार्गावर पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शनिवार व रविवारी तर सतरा प्लाझा समोरील बेकायदा पार्किंगवर तात्पुरती कारवाई केली जाते.परंतू वारंवार कारवाई करुनही पार्किंगचा प्रश्न सर्वच ठिकाणी जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.

शहराअंतर्गत पार्किंगचा पुरता बोजवारा उडत आहे.कार्यालयीन वेळाबरोबरच संध्याकाळच्यावेळीही घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना पार्किंग करायचे तरी कुठे असा प्रश्न सातत्याने पडत आहे. बेलापूर ते दिघा प्रत्येक विभागात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे.पार्किंग जागांपेक्षा गाड्या उदंड असे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे.

हेही वाचा >>> राज्यात हंगामातील पाऊस सरासरीपुढेच; जाणून घ्या तुमच्या भागात किती पाऊस पडणार

नवी मुंबईचा क्विन नेकलेस असलेल्या पामबीच मार्ग हा वेगवान व देखणा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतू याच मार्गावर वाशी रेल्वे उड्डाणपुल सोडताच वाशी उपनगराला सुरुवात होते.या उपनगराच्या पहिल्याच आरेंजा सिग्नलपासून ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते.आयुक्त तुकाराम मुंढे ते बांगर यांच्या कार्यकाळात आजही प्रश्न जैसे थे आहे.शहरात वाहतूक विभागामार्फत बेकायदा पार्किंगवर कारवाई केली जाते.परंतू त्यांनाही मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. सिडकोकडून पालिकेला पार्किंगसाठी मिळणाऱे भूखंड अद्याप लालफितीतच अडकले आहे. त्यामुळे शहरात पार्किंगबाबत ठोस उपाययोजना न झाल्यास नियोजित नवी मुंबई शहरात पार्किंग धोरणाचे तीन तेरा वाजतच राहणार असे चित्र आहे.

शहरात खाजगी आस्थापना पार्किंगबाबत हात वरत असल्याने वाहने रस्त्यावरच पार्किंग होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे पार्किंगचा प्रश्न आगामी काळात अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> पशुवैद्यकीय अधिकारी माघारी…

वाहतूक विभागाच्या कारवाईची धास्ती नाहीच…

नवी मुंबई शहरात बेकायदा पार्किंगबाबत वाहतूक विभागाद्वारे कारवाई करण्यात येते पण वाहनांची संख्या व संबंधित स्थानिक आस्थापनांनी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गाडी लावायला जागाच नसते. त्यामुळे जागा मिळेल तिथे पार्किंग केले जाते.

नव्या पालिका आयुक्तांकडून आशा…..

शहरात दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला असून नवे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून शहरातील पार्किंग बाबत ठोस उपाय योजना राबविण्यात येतील अशी आशा नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.