scorecardresearch

Premium

एपीएमसी मध्ये दुकानधारकांचे बस्तान फुटपाथवर सुरूच

एकेकाळी वाढीव जागेच्या वापरावर कारवाईचा बडगा उरगला होता, पंरतु आता पालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

APMC, stalls shopkeepers continue footpaths marginal space
एपीएमसी मध्ये दुकानधारकांचे बस्तान फुटपाथवर सुरूच (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम, फेरीवले,मार्जिनल जागेचा वापर करणाऱ्या दुकान धारकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु आता ही धडक कारवाई मंदावली असून शहरात ठिकठिकाणी व्यवसायिक व दुकानधारक सर्रास व्यवसाय करण्यासाठी वाढीव जागेचा वापर करीत आहेत.

वाशी एपीएमसी से.१९ येथील बाजार आवारात ही वाढीव जागेचा वापर सुरूच आहे. एकेकाळी वाढीव जागेच्या वापरावर कारवाईचा बडगा उरगला होता, पंरतु आता पालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. एपीएमसी माथाडी भवन येथील बाजारात आधीच पार्किंगची समस्या उद्भवत आहे. हा बाजार परिसरातील रस्ता हा पाचही बाजाराला जोडला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमीच असते. त्यामध्ये रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा विळखा असतो, अशातच येथील व्यापारी दुकान धारक आपला बाजार वाढीव जागेत मांडून ठेवत असतात. याठिकाणी विद्युत रोषणाईचे सामान, किराणा बाजार, करकोळ बाजार, असे अनेक प्रकारचे दुकान आहेत.

anesh naik is biggest obstacle in redevelopment of cidco buildings and slums in navi mumbai city says shinde group leaders
नवी मुंबईतील विकासकामांवरून शिंदे गटाची नाईकांवर आगपाखड; झोपडपट्टी पूनर्विकासावरून तणाव वाढला
Gunratna sadavarte
“गांधींचे विचार संपले, या देशात आता नथुराम…”, गुणरत्न सदावर्ते बरळले; म्हणाले, “भारताचे तुकडे…”
after flood queues of vehicles at servicing centers
उपराजधानीतील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये अचानक वाहनांच्या रांगा..!!
india's retail inflation rate, india's retail inflation rate declined
महागाईतून काही अंशी दिलासा; जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दरात घट

हेही वाचा… उरण मध्ये एनएमएमटीच्या इलेक्ट्रिक बसच्या नादुरुस्तीत वाढ; भर रस्त्यात बस बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त

मात्र ही मंडळी त्यांचे सामान अधिक जागेत पसरवून ठेवून मार्जिनल जागेचा वापर करीत आहेत. रस्त्यालगत पार्किंग व फुटपाथाला लागून व्यापाऱ्यांचे बस्तान यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरुन जाताना त्रास सहन करावा लागत आहे. तत्कालीन आयुक्त यांच्या काळात येथील मार्जिनल जागेच्या वापरावर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता याठिकाणी पून्हा मार्जिनल जागेचा अमाप वापर सुरूच आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In apmc stalls of shopkeepers continue on footpaths using marginal space dvr

First published on: 26-09-2023 at 15:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×