नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र ४९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अद्याप पुढील १३७ दिवस पुरेल एवढा जलसाठा धरणात आहे. नवी मुंबईकरांना मात्र १० ऑगस्टपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे. तरीदेखील नवी मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण २४ सप्टेंबर २०२३ रोजी १०० टक्के भरले व धरणातून १९.०८७ क्युबिक मीटर पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. महापालिकेच्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून अधिक पाणी उपसा केला जात आहे.

Water supply to Ulve,
उलवे, खारघर, तळोजासह द्रोणागिरीला पाणी पुरवठा शुक्रवार ते शनिवार बंद राहणार
mmrda to build third mumbai around atal setu
नवी मुंबईतील ‘नवनगरा’स तीव्र विरोध; कोकण भवनात शेकडो गावांमधून १० हजारांवर हरकती   
pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
navi mumbai footpath marathi news, navi mumbai builder marathi news
नवी मुंबई: पदपथावर बांधकाम व्यावसायिकाचे अनधिकृत कार्यालय

हेही वाचा…नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

शहरात झपाट्याने होणारी लोकसंख्यावाढ पाहता भविष्यात महापालिकेने अर्थसंकल्पातही भिरा कुंडलिका प्रकल्पातील तसेच नवीन पाणीस्राोत निर्माण करण्याकडेही नियोजन केले आहे. तसेच पालिका सिडकोकडून १० एमएलडी पाण्याची देवाणघेवाण करण्याच्या तयारीत आहे. महापालिकेला एमआयडीसीकडून मिळणार हक्काचे ८० एमएलडी पाणी मिळत नसून आजघडीला ते फक्त ७० एमएलडीपर्यंत मिळत असल्याने पालिकेच्या हक्काचे जवळजवळ १० एमएलडी अतिरिक्त पाणी शिंदे मिळवून देतील अशी आशा आहे. महापालिकेने पाणी वितरण व्यवस्थेबाबत व मोरबेतील पाणी उपशाबाबत दिवसाला धरणातून ४५० दशलक्ष लिटर पाणी उपसा एवढेच पाणी घेतले जाण्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : ५२ लाख १३ हजारांची फसवणूक…… कमी वेळात जास्त परताव्याचे आमिष पडले महागात 

मोरबे धरणातील २५ मार्चपर्यंतची पाणीस्थिती

२०२२-२३ २०२३- २४

धरणातील पाऊस ३५५९.४० मिमी. ३७७०.४०

धरण पातळी ७६.६८ मीटर ७६.६८ मीटर

धरणातील जलसाठा ११६.८६० दलघमी ११८.२५० दलघमी

किती टक्के पाणीसाठी ४९.४८ टक्के ४९.४८ टक्के

नवी मुंबई शहराला सुव्यवस्थितपणे पाणीपुरवठा होईल याबाबत पालिका प्रशासनामार्फत खबरदारी घेण्यात येईल. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका