उरण : सप्टेंबर अखेरची आणि ऑक्टोबरची सुरुवात याकाळात थंडीची चाहूल लागत असून उरणमध्ये बुधवारी सकाळी १० ते साडेदहा वाजता काही प्रमाणात वातावरणात धुके पसरले होते. मात्र हे धुके आहे की प्रदूषणाचे धुरके आहे, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्रीच्या वेळी उरण शहर व परिसरात झालेल्या पावसानंतर धुक्याचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे हे खरंच धुकं आहे की, हवेतील वाढते प्रदूषण अशी शंका उरण मधील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : थकीत मालमत्ता कराच्या सवलतीसाठी पनवेलच्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे घालणार

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

हेही वाचा : एपीएमसी मध्ये दुकानधारकांचे बस्तान फुटपाथवर सुरूच

सध्या वातावरणात क्षणा क्षणाला बदल होत आहेत. याचा परिणाम मानवी जीवन आणि आयुष्यावर पडू लागला आहे. यामध्ये लांबणारा पाऊस, वेळी अवेळी कधीही कोसळधार, उशिरा सुरू झालेली थंडी, कडक ऊन यामुळे कोणता ऋतु कधी सुरू होतो आणि संपतो याचा अंदाज येत नाही. अशीच काहीशी स्थिती सध्या उरण मधील वातावरणात दिसू लागली आहे. उरण मधील औद्योगिक परिसरात निर्माण होणारा धूर, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत असलेली धूळ याचाही परिणाम होऊन वातावरणात धुळीकणाचे प्रमाण ही वाढले आहे. दिवसभर धुरके वातावरण निर्माण होणे हे हवेतील प्रदूषणाचे लक्षण असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उरण मधील हवाही आता प्रदूषित झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.