नवी मुंबई : सीवूडस् पूर्व विभागतील सेक्टर २५ येथील अंबिका हाइट्स सोसायटीतील बाराव्या मजल्यावर १२०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अचानक आग लागल्याने सोसायटीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरात मोठे नुकसान झाले असून घरातून आगीच्या ज्वाळा व धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहे. या आगीमुळे सोसायटी सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने सर्व सदस्यांनी तात्काळ तळमजला गाठला.

हेही वाचा : नवी मुंबई : सुरक्षा रक्षक असलेल्या उद्यानात आत्महत्या  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोसायटी पासून काही अंतरावरच असलेल्या नेरूळ अग्निशमन केंद्राच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून बाराव्या मजल्यावरील १२०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये लागलेली आग विझवली. आगीची घटना घडलेल्या फ्लॅटमध्ये एक डॉक्टर महिला राहत असून आग लागण्याच्या काही वेळापूर्वीच कामानिमित्त ही डॉक्टर महिला घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही . परंतु या दुर्घटनेत घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशामन विभागाकडून अद्याप या घटनेचे ठोस कारण समोर आले नसून प्राथमिक अंदाजानुसार ही घटना शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी कोळी यांनी सांगितले.