पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील दीपक फर्टीलायझर कंपनीमध्ये गुरुवारी मध्यरात्री तीन चोर दीपक फर्टीलायझर कंपनीत शिरुन चोरी करताना कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेने त्रिकुटाला रंगेहाथ पकडले. यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.  दीपक फर्टीलायझर कंपनीमध्ये शेतीच्या खतापासून ब्लास्टींग पावडर आणि पेट्रोकेमीकलची उत्पादने बनविली जातात. कंपनीलगतच्या वलम गावात राहणा-या तीन चोरटे गुरुवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सूमारास १५ फूटी उंच कुंपनावरुन कंपनीत शिरले.

हेही वाचा : नवी मुंबई : कांद्याच्या दरात घसरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीत शिरल्यावर चोरट्यांनी लोखंडी पाईप, लोखंडी अॅंगल, बॉक्स पाईप, लोखंडी जाळ्या आणि नॉयलनच्या दोरीसह दीपक कंपनीच्या सूरक्षा यंत्रणेने चोरट्यांना रंगेहाथ पकडले. १ लाख ३५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दीपक कंपनीच्या व्यवस्थापनाने चोरट्यांना तळोजा पोलीसांच्या स्वाधीन केले. पोलीसांनी या प्रकरणातील संशयीत रामब्रिज चौहान, विकास रामब्रिज चौहान, दीपक चौहान यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.