नवी मुंबई : नवी मुंबईत आता भाडेकरू देताना पोलीस एन.ओ .सी अर्थात ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही मात्र पोलीस ठाण्याला भाडेकरूंचे ओळखपत्र, पॅनकार्ड आणि फोटो जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवी मुंबईत व्यावसायिक गाळा, अथवा घर घेऊन आर्थिक फसवणूक, घरफोडी, अंमली पदार्थ व्यापार अनेक ठिकाणी होतो. हे करत असताना गुन्हेगार आपली माहिती त्या गाळा किंवा आणि सदनिका मालकपासून लपवून ठेवत खोटी माहिती देतात. असे सर्वाधिक प्रकार वाशी आणि सीबीडी भागात निदर्शनास आले आहेत.

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून मुख्य गुन्हेगार पळून जातात. तर उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. तसेच नायझेरियन नागरिक दुप्पट तिप्पट भाडे देतात म्हणून त्यांना भाड्याने घर मिळते मात्र बहुतांश वेळा त्यांचा धिंगाणा गुंडगिरी आणि अमली पदार्थ वितरणमध्ये सहभाग आढळून आला आहे. हा प्रकार सर्वाधिक कोपरखैरणे भागात होत होता. मात्र, आता खारघर आणि परिसरात होत असल्याचे समोर आले आहे. या वर्षाच्या सुरवातीलाच अमली पदार्थ प्रकरणी 9 नायझेरियन आणि एका युगांडाच्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा : सकाळी ७ वाजता सुरू होते उरण शहरात वाहतूक कोंडी, शालेय विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त

याशिवाय जुईनगर येथील एका बँकेच्या लॉकरमध्ये दरोडा टाकणाऱ्यांनी बँक नजीकचा एक गाळा भाड्याने घेत किराणा दुकान थाटले होते. तेथून भुयार पडून बँक लॉकर खोलीत पोहचले होते. हा दरोडा जगभर गाजला होता. कामोठे येथेही सोन्याच्या पेढी शेजारी गाळा घेत आरोपीने फळांचे दुकान थाटले होते. एके दिवशी रात्री भिंत फोडून दुकानात प्रवेश करून सर्व सोने आणि रोकड घेऊन आरोपी पळून गेला होता. अशा अनेक घटनेत भाडेकरूची पुरेशी माहिती ना पोलिसांना देण्यात आली होती ना मालकांनी स्वतः घेतली होती. त्यामुळे तपास कामात अडथळे निर्माण झाले होते.

हेही वाचा : नवी मुंबई महापालिकेची अद्ययावत संगणकीय प्रणाली ९ महिन्यात!

अनेकदा गुन्हा करण्यासाठी तात्पुरती जागा भाड्याने घेणाऱ्यांना पोलिसांची कुणकुण लागताच किंवा आपले इप्सित साध्य होताच, गुन्हेगार परागंदा होतात. अशा वेळी पोलीस तपास कामात अडथळा निर्माण होतो. दुसरीकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी काही कर्मचाऱ्यांकडून ‘चिरीमिरी’ची अपेक्षा ठेवली जात असल्याचाही आरोप केला जातो. हे  टाळण्यासाठी आता ना हरकत प्रमाणपत्र ऐवजी भाडेकरूची पूर्ण माहिती व फोटो नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक पानसरे ( पोलीस उपायुक्त परिमंडळ एक) आता ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही . मात्र भाडेकरूची पूर्ण माहिती व फोटो नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करावे.